Contribute
संस्थेसाठी आपण हे नक्की करू शकाल:
- संस्थेचे सभासद व्हा व आपलया नातेवाईकांना सभासद करा.
- शताब्दी महोत्सववासाठी देणगी.
- इमारत निधीस देणगी.
- शेक्षाणिक निधीस देणगी.
- वैद्यकीय सहाय्य निधीस देणगी.
- संस्थेस जाहिराती द्वारा आर्थिक उत्पन्न मिळवून देणे.
- आपत्कालीन निधीसाठी देणगी.
देणगी जमा करण्यासाठी, बँकेचे तपशील:
बँक ऑफ महाराष्ट्र ,
कसबा पेठ शाखा
बचत खाते क्र. 20037966799
IFSC CODE:MAHB0000322
टीप : देणगीची रक्कम आपण संस्थेच्या बँकेत RTGS/NEFT द्वारे परस्पर जमा करू शकता. कृपया रक्कम जमा केल्यावर स्क्रीनशॉट घेऊन संस्थेच्या 9404237123 या व्हाट्स अँप नंबर वर पाठवावा हि विनंती, म्हणजे खात्री करून घेऊन पावती देता येईल.
संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्ताने सभासदांना आवाहन
प्रत्येक सभासदाने २०२२,२०२३,२०२४ या तीन वर्षात प्रतिवर्षी कमीतकमी रु. ५००/- देणगी द्यावी. या तीन वर्षात आपण सर्वजण सहभागी झालो, तर २०२४ च्या अखेरीस सर्व सभासदांच्या देणगी रूपाने जमा होणारा निधी रु. १ कोटी इतका होऊ शकतो.( प्रतिवर्षी रु. ५००/- * ६००० सभासद = रु. ३० लाख + त्यावर्षीचे व्याज असे मिळून रु. १ कोटी होतात )संस्थेने आपल्याकडे फक्त रु.५००/- मागितले आहेत. आणि तेही वर्षातून एकदाच आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक सभासदाला ते देणे शक्य आहे. काही जणं यापेक्षा अधिक देऊ शकतात. यासाठी संस्थेच्या अध्यक्षांनी रु. १ लाख देणगी सन २०२२ मध्ये दिलेली आहे आणि आणि येणाऱ्या २ वर्षात रु. २ लाख देणार आहेत.आणखी एक विश्वस्त रु. १ लाख देणगी देणार आहेत. तसेच उर्वरीत विश्वस्त व कार्यकारी मंडळ सदस्य हे प्रत्येकी रु. ५००००/- याप्रमाण निधी देणार अजून काही जणांनी यापूर्वीच निधी जमा केलेली आहे. या निधीला प्रारंभ होऊन आज आखेल रु. ४ लाख जमा झालेले आहेत. थेंबे थेंबे तळे साचे हि उक्ती प्रत्येक्षात साकार करून आपण यात सहनभागी होऊ शकता.
(टीप: सन २०२२ हे साल संपले असले तरी त्या वर्षाची रु.५००/-हि देणगी सन २०२३ मध्ये देता देऊ शकेल.)
वरील निधीतून खालील उपक्रम राबविण्याची योजना आहे
२. संस्थेची वास्तु (यामध्ये एकनाथ मंगल कार्यालय, शिंगरे सभागृह, विद्यार्थी वसतिगृह व चाळ यांचा समावेश आहे.) जुनी झालेली आहे. देखभाल दुरुस्तीसाठी प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. तसेच दोनही मंगल कार्यालये यासाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. याकरिता या वास्तुचा पुनर्विकास करणे अत्यावश्यक आहे. या पुनर्विकासासाठी अंदाजे रु. ४ ते ५ कोटी इतका खर्च येणार आहे. यासाठीही निधी गोळा करणे आवश्यक आहे. त्याकरिताही प्रयत्न सुरु आहेत.
३. आपल्या समाजात आर्थिक अडचणींमुळे काही जणं विपन्न अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुला-मुलींना पुढचे शिक्षण घेता येत नाही. त्यांना या निधीच्या व्याजातून शिक्षणाकरिता काही आर्थिक मदत देऊ शकतो आणि त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहू शकतो. तसेच विद्यार्थी पारितोषिक यासाठी खूप मोठी वाढ करून शिक्षणाला उत्तेजन देणार आहोत. आपल्या संस्थेच्या नावातच शिक्षणोत्तेजक हा शब्द आहेच. सध्या आपण प्रतिवर्षी रु.७५ हजार पर्यंत खर्च करीत आहोत.
४. वैद्यकीय सहाय्य योजनेच्या रकमेत वाढ करावयाची आहे.
५. आपातकालीन निधी उभारणे.
या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे नियोजन सुरु असून आपणही आपल्या काही सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात संस्थेकडे कळवाव्यात व यामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती आहे.
(टीप : कृपया आपला व्हॉट्सअप नंबर संस्थेस कळवावा, संपर्क साधण्यास सोईचे होईल.)