सुनील देशमुख
पुरस्कार प्रवर्तक
सर्वप्रथम सर्व पुरस्कार विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. हे पुरस्कार आम्हाला त्यांच्याविषयी वाटणारा आदर आणि त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिले जात आहेत.
मनीषा गुप्ते
पुरस्कार प्रवर्तक
महाराष्ट्र फाऊंडेशन आणि मासूमच्या सर्व हितचिंतकांना संयोजकांकडून जिंदाबाद! १९९६पासून ‘समाजकार्या’च्या क्षेत्रातील तशाच उल्लेखनीय व अनुकरणीय व्यक्तींना पुरस्कार दिले जातात.
राजीव भालेराव
अध्यक्ष
सर्व पुरस्कार सन्मानित व्यक्तींचे हार्दिक अभिनंदन. सर्वांसाठी सामाजिक आणि आर्थिक न्याय’ हा आमचा ध्यास आहे. या ध्यासाचा पाठपुरावा महाराष्ट्र फाउंडेशन दोन पद्धतीने करते.
राजन गडकरी
आधारस्तंभ
राजन गडकरी हे कर्तृत्ववान आणि द्रष्टे म्हणून सर्वज्ञात आहेत. पारितोषिक योजनेचे निकष, स्वरूप व कार्यपद्धती यांची चर्चा व मार्गदर्शक म्हणून गडकरींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
शताब्दी महोत्सव
सामाजिक गरज, समाजसेवेचे व्रत आणि विधायक भूमिका या तीनही गोष्टींचा संगम साधीत पुण्यक्षेत्री कार्तिक शुद्ध प्रतिपदा दीपावली पाडवा म्हणजेच दि. २९ ऑक्टोबर १९२४ रोजी देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण शिक्षणोत्तेजक संस्थेने आपल्या कार्याची मुहूर्तमेढ श्रीमंत सरदार पुरंदरे यांच्या वाड्यात रोवली. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या मुंबई इलाख्यातील पहिली संस्था म्हणून या संस्थेची नोंद आहे.
आज या गोष्टीला ९९ वर्ष पूर्ण झाली असून संस्था शताब्दीपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. कोणत्याही प्रकारच्या यशापयशाची, कीर्तीची वा धनाची अपेक्षा न करता, प्रसिध्दीपराङमुख असलेल्या तत्कालीन समाजधुरीणांनी सुरु केलेल्या कार्याचा ‘वेलू आज गगनावर’ चढत गेला आहे.
या वर्षी वर्धापन दिनाच्यादिवशी संस्थेच्या विश्वस्त मंडळाची (पुरुष व महिला ) यांची बैठक होऊन सर्वानुमते येणारे शताब्दी वर्ष भारदस्त कार्यक्रम, उपक्रमांनी संपन्न करावयाचे ठरवले आहे. आपण प्रतिवर्षी श्रावणी, विद्यार्थी पारितोषिक वितरण, वर्धापन दिन, कोजागिरी, वैदिक व्याख्यानमाला, शारदीय नवरात्राचे कार्यक्रम, संस्थेच्या मानाचा ऋग्वेद भूषण पुरस्कार वितरण इ. कार्यक्रम करीत आहोत. यातूनच आपल्या समाज बांधवांशी सातत्याने संपर्क होतो. यासाठी विश्वस्त मंडळाच्या प्रतिमाह होणाऱ्या बैठका, कार्यकारी मंडळाच्या बैठका, महिला शाखांच्या बैठका, यातून कार्यक्रमाला गती मिळत असते. यामुळे संस्थेची गुणात्मक वाढ होत असते.
संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर प्रतिवर्षीचे कार्यक्रमाव्यतिरिक्त खालील कार्यक्रमचे नियोजन केले गेले आहेत
१. रक्तदान शिबिर
२. आरोग्य शिबिर
३. सर्व ब्राम्हणेतर जाती संस्थेचा सत्कार
४. चार वेदांचे मंत्रजागर
५. ऋग्वेद स्वाहाकार
६. वृक्षारोपण
७. चैत्र शु. प्रतिपदा (रामकथा आणि गीत रामायण)
८. शोभा यात्रा
९. दिवाळी मेळा
१०. स्मरणिका प्रकाशन
११. संकेतस्थळाचे उद्घाटन
उद्दिष्ट
संस्था स्थापण्यामागे जे उद्दिष्ट त्यावेळच्या समाजसुधारीण संस्थापकांनी ठरविले होते ते अत्यंत स्पष्ट व समाजहिताकारक असे होते. समाज संघटन करावे आणि त्याचबरोबर समाजाची सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक अशी विविध बाबतीत उन्नती करावी असा उद्देश त्यामागे होता. संस्थेच्या ध्येय उद्दिष्टांमध्ये देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाजाच्या उन्नतीचा विचार जरी प्रामुख्याने होता तरी कालांतराने हिंदू समाजातील सर्व ज्ञाती संघटनांच्या सहकार्याने अखिल हिंदू समाज एकत्र आणून व समान पातळीवर एकाच व्यासपीठावर संघटीत करून सर्व समाजाच्या उन्नतीचे कार्य करण्याचे अंतिम ध्येय संस्थेच्या घटनेत समाविष्ट करण्यात आले आहे व त्यानुसार संस्थेची वाटचाल चालू आहे. गेली ९९ वर्षे संस्था शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यात मग्न आहे. या संस्थेच्या कार्याचा महत्वाचा घटक म्हणजे शैक्षणिक सहाय्य. संस्था प्रतिवर्षी सुमारे रू. ६० ते ७० हजारांची विद्यार्थ्यांसाठी पारितोषिके व आर्थिक मदत, परतफेडीची शिष्यवृत्ती यावर खर्च करीत उल्लेखनीय कार्य करीत आहे, तर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अंदाजे रू. ४. ५० लाख खर्च करीत आहे. संस्थेच्या उपक्रमांमध्ये व कार्यामध्ये महिलांचाही सहभाग मोठया प्रमाणावर असून संस्थेच्या शहर महिला शाखा, मुकुंदनगर महिला शाखा व सहकारनगर महिला शाखा अशा तीन महिला शाखा आहेत. संस्थेच्या वतीने इतर विविध उपक्रम राबविले जातात. त्याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे.
१. सामुदायिक व्रतबंध
२. वैदिक व्याख्यानमाला (अश्विन शुद्ध एकादशी ते कोजागिरी पौर्णिमा )
३. शारदीय व्याख्यानमाला (आश्विन)
४. वधू – वर सूचक केंद्र व वधू – वर मेळावे
५. श्री एकनाथ मंगल कार्यालय व शिंगरे सभागृह अशी संस्थेची दोन कार्यालये असून,ती संस्थेच्या सभासदांना त्यांच्या घरातील कार्यासाठी सवलतीच्या दरामध्ये दिली जातात.
६. मराठी, इंग्रजी माध्यमाची बालवाडी
७. तुकारामबीज ते श्रीसंत एकनाथषष्ठी सांस्कृतिक कार्यक्रम
८. ऋग्वेद भूषण व इतर विविध ३० पुरस्कारांचे वितरण
९. सभासदांना वैद्यकीय सहाय्य
१०. ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह
इंग्रजीत वाचण्यासाठी क्लिक करा
Deshastha Rugvedi Brahman Shikshanottejak Sanstha, Pune is one of the pioneering institutes of its kind in western India. Established on 29th October, 1924 on the auspicious day of Diwali – Balipratipada (Kartik Month is one of the bright month of the year), is started functioning from the house of the Late Sardar Purandare. It’s aim was to address the needs of community with the spirit of social service and with constructive approach to its problems. So far, it has completed 99 years of useful social activities, undertaken and carried out successfully by its successive office-bearer without any consideration of gain of publicity. Over these 99 years, the Sanstha’s activities have grown phenomenally.
Contribute To The Cause
The aim and objectives which its founder had kept before them were very clear. Their aim was to organize the community and to achieve its all-round religious, cultural, educational and economic upliftment. Though it mainly concentrated on amelioration of Deshastha Rugvedi Brahmans, its ultimate objective was to achieve total upliftment of the entire Hindu society by uniting all caste organizations and institutions and to provide them a common platform.
This objective has been clearly stated in the Sanstha’s Constitutions and its activities are orchestrated in that direction. Its essential activity is to provide financial assistance to deserving and needy students. On an average it spends about Rs.75,000/- per year on prizes, loan scholarships, and educational assistance. It spends nearly Rs. 5,00,000/- every year on its cultural activities. Most laudable of these activities is the ladies participation in them. There are three ladies wings of the Sanstha namely, Shahar Mahila Shakha , Mukund Nagar Mahila Shakha and Sahakar Nagar Mahila Shakha.